उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली येथे जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन तथा जागतिक पंचशील ध्वज दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी मागासवर्गीय समितीच्या सभापती तथा नगरसेविका शेवंता वाघमारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख जितेंद्र कोलप व इतर समता सैनिक यांनी ध्वजवंदना दिली.
बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली येथे दिनांक 7 जानेवारी रोजी रविवारच्या धम्मदीन सत्रामध्ये बौद्ध धम्म संस्कार संघाचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी उपस्थित सर्व उपासक उपाशीका यांचे स्वागत केले आणि आभार मानून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली
यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत रणधीर यांनी पंचशील ध्वज दिनाचे महत्त्व आणि प्रमुख बाबी ठळकपणे सांगितल्या. श्रावस्ती विहाराचे संचालक चंद्रकांत चौधरी यांनी जागतिक ध्वज दिन कसा साजरा करण्यात आला याबाबत उत्क्रांती कशी होत गेली आणि पंचशील पंचशील ध्वज कशाप्रकारे तयार करण्यात आला आणि त्याचे रंगाचे महत्त्व त्याचप्रमाणे अमेरिकेचे सैनिक दलाचे कॅप्टन हेन्री वॉलकोट यांनी बौद्ध धम्म स्वीकारून जागतिक पंचशील ध्वजाचे खरे जनक असल्याचे व्यवस्थित पणे माहिती सांगितली. बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी प्रमुख पाहुण्याचा सत्कार करून सर्व उपस्थित सभासद उपासक यांचे आभार मानले.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे सरचिटणीस आयुष्यमान जितेंद्र कोलप समता सैनिक दलाचे अन्य पदाधिकारी यांनी संचालन केले तर एस. आर. माने सर यांनी प्रास्ताविक केले, सुनिता धम्मकीर्ती उपाध्यक्ष यांनी त्यांचा चिरंजीव शीलसागर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रावस्ती विहारस अर्थदान दिले. यावेळी विहाराचे सल्लागार संजीव साबळे, संजय घाडगे, जगन्नाथ आठवले संचालक, पारर्मीत धम्म कीर्ती, आनंदा कवठेकर, शिंदे मॅडम आदी उपासक उपस्थित होते.
रविवारच्या सत्रमध्ये भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काय स्वीकारले आणि दुःखाचे निवारण करण्याचे मार्गावरआरुढ झाल्यास मानवी जीवन की आणि संपन्न होईल आणि संपूर्ण जगामध्ये शांतता प्राप्त होईल. युद्ध नको बुद्ध हवा हाच नारा जगामध्ये दुमदुमला जाईल अशी धम्मदेशना विहाराचे संचालक सी. बी. चौधरी यांनी दिली.

