नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- काल मध्यान्हाच्या सुमारास रात्री 2.30 वाजताच्या सुमारास मयुरेश हुमणे या चीखलवाडीतील तरुणाने नौपाडा रक्षक किरण नाकती यांना कॉल केला की, दादा आपल्याईथे रस्त्यात झाड पडलंय. किरण नाकती व त्यांचे सहकारी संजय पवार एका घोडबंदर येथील हॉस्पिटल मध्ये एका रुग्णाला घेऊन गेले होते.
तिथूनच त्यांनी ठाणे महानगर पालिकाच्या आपत्कालीन विभागाला कॉल केला. किरण नाकती स्वतः घटनास्थळी पोहोचले व ते आपत्कालीन टीम सुद्धा पोहोचली. पडलेल्या झाडाची अवस्था लक्षात घेता तातडीने अग्निशमन दल व विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावले.
मोठ्या झाडाच्या फांदीसहित विजेचा खांबावरील दिवा निखळला होता. हे फुटपाथ व रस्त्यावर पडल्यामुळे पहाटे चालायला येणारे माझ्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक व इतरांना इजा होण्याची शक्यता होती. तसेच दुसरी मोठी फांदी निखळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. परंतु सुमारे एक ते दीड तासाच्या कार्यवाहीनंतर पडलेले झाड बाजूला काढण्यात यश मिळाले. हि गोष्ट मला आज पहाटे चालायला गेलो तेव्हा स्थानिक एका व्यक्तीने सांगितली.
ती व्यक्ती भरभरून किरण नाकती यांचे कौतुक करत होती. आम्ही रात्री अपरात्री कधीही कॉल केला तरी किरण दादा हजर होतात असे सांगत त्यांनीच हि सर्व घटना मला सांगितली. मी व माझ्या अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांतर्फे किरण नाकती व नौपाडा रक्षक टीमचे आभार मानतो. मी सुद्धा किरण नाकती सर व त्यांच्या टीमचे काम अनुभवले आहे.
कोविड मध्ये आम्हाला मोफत लसीकरण त्यांनीच करून दिले होते. मी स्वतः उथळसर येथे रहातो पण दररोज मॉर्निंग वॉकसाठी माझ्या मित्रांसोबत याच रस्त्याने बारा बंगला येथे जातो. नौपाडा रक्षकच्या हजरबाबीपणामुळे मोठी दुर्घटना टळली.अशा या आजच्या आधुनिक युगातील श्रावण बाळाचे म्हणजेच किरण नाकती यांचे आभार मानतो. शामराव देसाई (ज्येष्ठ नागरिक)

