मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा-बल्लारशाहा यात्री संघाची नवनियुक्त कार्यकारणी गठित केली आहे. वर्धा-बल्लारशाहा यात्री संघाचे अध्यक्षपदी राजेश अ. कोचर, संघटकपदी लिलाधर मडावी, उपाध्यक्षपदी दिलीप बालपांडे, सचिवपदी डि.के. गुरनुले, कोषाध्यक्षपदी रवि जुमडे, सहसचिवपदी मो. शहजाद, सल्लागार समितीमध्ये बाबुसिंग गहेरवार, अरुण दुधे, प्रा. किरण वैद्य, चंद्रशेखर खापरे, विजय मुथ्था, सुनिल डोंगरे, प्रविण कडू, अशोक सोरते, राजेश मुनोत, महेश अग्रवाल, मुरली लाहोटी, रमेश वनकर, किशोर सिंगरू, डॉ. मधुसुदन गोयनका, मनोज रूपारेल, सुंदर बसंतानी, शाम इडपवार, सुभाष निनावे, रवि बुरीले तथा सदस्य कमेटीमध्ये तेपश चंदाराणा, राष्ट्रपाल कांबळे, किशोर रहेजा, गणेश जोशी, राजेश फुलझेले, विलास चेपे, अजय येनकर, शरद ढोक, मो. आरीफुद्दीन, मुन्ना त्रिवेदी, हरिश सिंघवी, संजय खत्री, गणेश रहेजा, रामलाल शर्मा, प्रकाश सिद्धमट्टीवार, शंतनु दवंडे, रूपचंद सहारे, भारतसिंग पवार, सुधाकर झोरे, मंगेश टोटावार, प्रवीण मानकर, नाजीर रुस्तम, श्रीकांत नल्लावार, कनक ओस्तवाल, दिनेश मोटवानी, विनोद पोतदार, रमेश खियानी, महेश खडसे, राजेश बतरा, चेतन सोनेकर, कु. एम. डी. गुरनुले, शुभम कोर्तावार, नरेंद्र नायडू, प्रविण कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक वर्धा – बल्लारशाहा यात्री संघाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या मध्ये 2024 या वर्षात संघाचे वतीने राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम व उपक्रमांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पर्यंत सदर कार्यकारणी कार्यान्वित राहील. यावेळी सभेमध्ये बल्लारशाह – मुंबई ट्रेन रोज सुरू करावी, बल्लारशाह – पुणे ही गाडी रोज सुरू करावी, काजीपेट – पुणे ही एक्सप्रेस साप्ताहिक आहे तीला रोज सुरू करण्यात यावे, भुसावळ – वर्धा मेमो पॅसेंजर बल्लारशाह पर्यंत वाढवावी, बल्लारशाह – वर्धा मेमो प्रवाशांनी वेळेवर प्रवास करावा.
नागपूर- माजरी- आदिलाबाद पॅसेंजर सुरू करावी, अजनी- काजीपेट पॅसेंजर सुरू करावी आणि कोरबा, इंदौर, रायपूर, लखनौ, जोधपूर, हिसरा (बिकानेर), धनबाद- कोल्हापूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा अप आणि डाऊन रेल्वे थांबा हिंगनघाट रेल्वे स्टेशनला देण्यात यावा, या मागण्या प्रामुख्याने सभेमध्ये करण्यात आली.

