अनिल अडकिने नागपूर – सावनेर प्रतिनिधी
मोबा. नं. – ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर दि.२३ जाने:- मंगळवार पासून सावनेर तहसिल कार्यालयाच्या गेट सामोर आम आदमी पक्षाचे आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे. सावनेर नगर परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या झुडपी जंगल जागेवर जवळपास ५० वर्षापासून अनेक नागरिक वास्तव्य करीत आहेत. त्यामधील एक भाग म्हणून शहरातील बरेच नागरिक पट्टे मिळावे म्हणून विनवण्या करीत आहेत. परंतु शासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. स्वतःच्या मालकीचे घर नसल्यामुळे शासनाच्या कुठल्याही योजनेचा फायदा त्यांना मिळत नाही.या वस्तीत गोरगरीब,मागासवर्गीय लोक वास्तव्य करीत आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
तेव्हा उपविभागीय अधिकारी यांना तातडीने बोलावून या समस्येचे समाधान करावे असे तोंडी आमच्या समक्ष आदेश दिले होते. तरीसुद्धा उपविभागीय अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले म्हणून त्यांना दि.13 डिसेंबर 2023 ला निवेदन देण्यात आले होते. पुन्हा 22 डिसेंबर ला स्मरण पत्र सुद्धा देण्यात आलेले होते.
उपविभागीय अधिकारी या विषयाला टाळाटाळ करीत असल्यामुळे आम्हाला उपोषणाच्या पर्याय निवडावा लागला. आम्ही भेटलो असता कुठलेही पत्र दाखवून आम्हाला वापस पाठवितात. त्याच प्रमाणे अतिवृष्टीमुळे कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी डबघाईस आलेला आहे. शेतकऱ्यांचे मुख्य पीक कापूस व कापसाला 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा ही आमची दुसरी मागणी आहे.
भाजपा सत्तेत आल्यावर काँग्रेस कापसाला 10 रुपये भाव मिळावा अशी मागणी करतो व काँग्रेस सत्तेत आल्यावर भाजपा 10 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी करतो. परंतु देत कोणीच नाही या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजयजी टेंभेकर हे आमरण उपोषणावर बसलेले आहे. मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजयजी टेंभेकर यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संजय राऊत, अतुल निकोसे, जामुंवत वारकरी, गजू चौधरी, शुंभम बागडे, अंन्सार शेख, रुही शेख, अरुण गुरव, राजू बहुरूपी, दिनेश मछले, राजकुमार बोरकर, प्रमोद तिखे, शुंभम साबळे, ठाकूरदास वैष्णव, वार्ड नंबर 17 येथील लखन कोल्हे, शोभाताई बरगट, बेबीबाई चौरे, वैशाली जंजाळ, मदन मोरे, बंडूजी चौरागडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

