देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- स्वामी विवेकानंद युद्ध मल्टीपर्पज सोसायटी हिंगणा द्वारा संचालित ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल मध्ये महिलांचा हार्दिक कुंकू कार्यक्रम मेळावा व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व या हळदी कुंकू च्या कार्यक्रमात जवळपास शंभर ते सव्वाशे महिलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या सर्वप्रथम चिमुकल्या मुलीची लूट करण्यात आली व त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये उखाण्यांची स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, पैठणी साडी स्पर्धा, दिवा पेटवणे स्पर्धा घेण्यात आल्या. व स्पर्धेत विजयी महिलांना पारितोषिके देण्यात आली.
यामध्ये पैठणी साडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भाग्यश्री सोनुले, द्वितीय क्रमांक कोमल साहू,तर तृतीय क्रमांक कल्पना पेंढारकर यांनी पटकाविला. उखाण्यांच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कल्पना पेंढारकर, द्वितीय क्रमांक अर्चना इंगळे यांनी पटकाविला. तर गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक किरण राऊत व द्वितीय क्रमांक मधू शर्मा यांनी पटकाविला. आणि दिवा पेटवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक किरण भगत व व द्वितीय क्रमांक अर्चना इंगळे यांनी पटकावून ते मानकरी ठरले.
या स्पर्धेचे आयोजन शाळेच्या संचालिका वर्षा कमलेश खोब्रागडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि प अध्यक्षा सौ. संध्याताई गोतमारे व प्रमुख अतिथी म्हणून ललिताताई झलके, ज्योतीताई गाडगे,मीनाताई रहांगडाले तर अतिथी म्हणून मायाताई आंबुलकर, अंजूताई पटले यांनी उपस्थिती राहुन महिलांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची शोभा वाढविली. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रतीक्षा राऊत, दिव्या हनवत, ममता कटरे, विना नाकाडे, रूपा बोटकावार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

