उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बार्शीटाकळी:- तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील महान धरणाजवळ वाघागड परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगत असताना मिळून आल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. परिसरात विविध चर्चेला उधाण आले आहे. या महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे.
ओळख पटविण्यासाठी पोलीसाचे आव्हान.. सदर महिलेचे वर्णन खालील प्रमाणे वयोगट अंदाजे ४५ ते ५० वर्षे, अंगात निळ्या रंगाची व लाल काठ पदराची साडी, निळ्या रंगाचे ब्लाऊज, हातात हिरव्या रंगाच्या प्लास्टीक बांगड्या, गळ्यात पिवळ्या मण्याचे मंगळसूत्र, पायात जोडवे नसलेली, काळया रंगाची स्लीपर चप्पल, सोबत शहाणे ज्वेलर्स मानोरा असे लिहीलेली पाऊच व काही पैसे वरील वर्णनाची महिला आपलेकडे मिसिंग असल्यास पोलीस स्टेशन पिंजर जि. अकोला येथे संपर्क करावा. असे सपोनि राहुल वाघ ठाणेदार (9850411528) यांनी आवाहन केले आहे.

