शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष नितेश कोहपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चामोर्शी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मच्चीलीटोला येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मच्छलिटोला येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष नितेश कोहपरे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी सौ. ममता जुनघरे उपाध्यक्षा, आत्माराम वैरागडे, सौ. झगडकर, सौ. वाकूडकर, उपसरपंच मनोज येलमुले, सौ. ज्योतिका कीर्तनिया सह पालक वर्ग व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थित मुला मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक माणिकचंद रामटेके मच्छलिटोला अथक परिश्रमाणे हा कार्यक्रम घडवून आणले. यावेळी संचालन सौ. गीता कापगते सं शिक्षका यांनी केल्या व आभार प्रदर्शन पंकज कुकुडकर यांनी केले. अशाप्रकारे मच्छलिटोला शाळेत 75 वा गणराज्य दिन मोठ्या उत्सहात पार पाडण्यात आले, आहे, गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

