निखिल पिदुरकर कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगांव:- संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा द्वारा संचालित राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजूराचे सचिव बंडू पाटील मोहीतकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. तसेच गाईड कॅप्टन मानसी वरारकर हिने स्काऊट ध्वज फडकविला. याप्रसंगी राजेंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. एम. लांडे, भोयगांव केंद्राचे केंद्रप्रमुख जांभूळकर सर, भोयगांवच्या प्रथम नागरीक सौ. शालिनीताई बोंडे, गावातील गणमान्य नागरीक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समारोपिय बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूपाटील मोहीतकर संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजूरा चे सचिव होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सामुहिक व एकल नृत्य सादर केले. कु. मानसी राजेंद्र वरारकर वर्ग १० वा या विद्यार्थींनींने लोकशाहीचा जागर हे भारूड सादर केले. कु. श्रुतीका पारखी व तानिया पिंपळशेंडे हिने गीत सादर केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लांडे सर यांनी केले. याप्रसंगी वर्ग ९ वी चा विद्यार्थी आर्यन आत्राम याने आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
सन २०२३-२४ चा बेस्ट स्टुडंट अवार्ड ने मानसी वरारकर ला सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्री. मोहितकर यांनी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी शिक्षणाकडे परिश्रमपूर्वक लक्ष देवून शाळेचा विकास करावा. पर्यायाने देशाचा विकास होईल. प्रत्येकाने व्यसनमुक्त, निरोगी व आनंदमय जीवन जगण्याचा सल्ला दिला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकरे सर तर आभार वैद्य मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली. अशाप्रकारे भारताचा 75वा प्रजासत्ताक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

