अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मोबा. नं.९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर- २७ जाने:- सावनेर येथिल नगरपरिषदेच्या ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ९.१५ वा.उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या हस्ते तहसीलदार मलिक विराणी, पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, नायब तहसीलदार संदीप डाबेराव, अनव्हाने साहेब, विजय कोहळे, स्वास्थ्य विभागाच्या डॉ. मंजुषा ढोबळे, डॉ.संदीप गुजर, डॉ.भगत, डॉ.शिवम पुण्यानी व इतर शहरवासी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी
ध्वजारोहणा नंतर स्वातंत्र्य सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व सहाय्यक ठाणेदार शरद भस्मे यांच्या नेतृत्वात सहाय्यक महिला ठाणेदार मंगला मोक्षे ,पोलीस होमगार्ड, एनसीसी कॅडेट, एनएसएस कॅडेट, अग्निशामक विभाग, नगर परिषद सावनेर, स्वास्थ विभाग इत्यादींनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर सावनेर येथील अनेक शाळेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले त्यात सुंदर असे नृत्य करून सगळ्यांचे मन जिंकले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तहसील ऑफिस, नगरपरिषद सावनेरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित गणमान्य व्यक्तींचे आभार तहसीलदार मलिक विराणी यांनी मानंले. ज्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नंबर आला त्या शाळांना बक्षीस -ट्रॉफी व प्रोत्साहन बक्षीस वितरण करण्यात आले.

