अक्षय म्हात्रे, पेन तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेन:- पी.पी.एल 2024 मैत्री ग्रुप आयोजित पाबळ विभाग प्रमिअर लिग अत्यंत शांततेत व आनंदी वातावरणात पार पडली. अख्या पागल विभागाचे लक्ष वेधून घेणारी प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वर जाधव, योगेश कडगे, हरेश आयरे, कल्पेश खोपरे व विलास जाधव यांच्या नियोजनात रेवली मैदान या ठिकाणी पार पडली.
प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश दादा दळवी व प्रसाद दादा भोईर यांच्या उपस्थितीत रेवलीच्या भव्य मैदानात दोन दिवस भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पारितोषिक विजेता वेद ऑरीअर्स चे ऑनर राकेश जाधव, कॅप्टन अमित वाघमारे, बॅटमन ज्ञानेश्वर शिर्के, सचिन तिर्के, नितेश झगडे, अभिषेक किरकला, रोशन ठमके, सिद्धेश जागडे, विशाल इंद्रे, सौरभ चितळकर, सत्यवान महाबले, प्रमोद जाधव, ज्ञानेश्वर कांगणे, अनिल झाग, बॉलर ओमकार शिंदे व टीमचे कोच विलास खांडेकर यांच्या अथक प्रयत्नाने व उत्कृष्ट खेळाने या वर्षाची विजयाचा ध्वज ही वेद ऑरीअर्स च्या खेळाडूंनी उंचावली आहे. त्यामुळे या टीमच्या सर्व खेळाडूंचे पेन तालुक्यात नाव गाजत आहे.

