अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मोबा. नं. -९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- राष्ट्रीय मनोविकास अक्षय क्षेत्रंम शाळा सावनेर येथे 75 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुषार उमाटे माजी बांधकाम समिती सभापती नगर परिषद सावनेर, प्रमुख पाहुणे म्हणून किशोर कुंभारे, अभिषेक गहरवार, शाळेचे मुख्याध्यपक पराग मुसळे व इतर मान्यवर तसेच पालक व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या शुभप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी आदित्य मधूकर राजुके याचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश घुगल व आभार प्रदर्शन शिवप्रसाद मिरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ व इतर साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

