संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर, नाशिक व अमरावती या तिन्ही विभागातील सर्व जिल्ह्यातील तंबाखू विरोधी यंग लिडर्स विद्यार्थ्यांकरीता दि. 30 जानेवारीला आयोजित विभागीय ऑनलाईन बालपरिषद 2024 मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मूर्ती, केंद्र नलफडी, पंचायत समिती राजुरा येथील विषय शिक्षक मनीष अशोक मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अस्मिता शिवाजी डाखरे, वर्ग 8 वा या विद्यार्थीनीने राजेंद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वाशिम यांच्या सोबत प्रश्नोत्तरे रूपात संवाद साधला. तर या बालपरिषदेचे संयुक्त सुत्रसंचलन मूर्ती येथील विषय शिक्षक मनीष अशोक मंगरूळकर यांनी केले.
बालपरिषद म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ. त्यात अस्मिताने सर्वप्रथम सादर केलेल्या तंबाखू विरोधी जनजागृती कार्याचे वाशिम जिल्हा शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी खूप कौतुक व हार्दिक अभिनंदन केले आणि त्यानंतर अस्मिताने विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर व सकारात्मक उत्तर त्यांनी दिले.
नागपूर, नाशिक व अमरावती या तीनही विभागा तील सर्व जिल्ह्यातील यंग लिडर्स विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सविस्तर मार्गदर्शन करण्या साठी या बालपरिषदेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले राजेंद्र शिंदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा वाशिम, श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कारंजा लाड, जिल्हा वाशिम, डॉ. मनीष बत्रा दंत शल्य चिकित्सक, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी जिल्हा भंडारा, डॉ शैलेश कुकडे कार्यक्रम व्यवस्थापक एनटीसीपी सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा भंडारा, रामदास आर. धनगर, मुख्य संपादक वत्सगुल्मा मीडिया नेटवर्क, जिल्हा वार्ताहर डी डी न्युज व हितवाद हे प्रतिनिधी उपस्थित होते.
या विभागीय ऑनलाईन बालपरिषदेसाठी कु. अस्मिता शिवाजी डाखरे, हिच्यासह मूर्ती शाळेतील कुंदन शालिक लांडे, वर्ग 7 वा, कु. तेजस्विनी रोशन ताकसांडे, वर्ग 8 वा, कु. जानवी सुरेंद्र वडस्कर, वर्ग 7 वा, श्रीजल रमेश शेरकी, वर्ग 7वा असे एकूण पाच विद्यार्थीगण व मार्गदर्शक शिक्षक मनीष मंगरूळकर यांनी मागील तीन महिन्यां पासून बालपरिषदेचे संपूर्ण 11 ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण केले. शाळा व गाव स्तरावर अतिशय प्रभावीपणे तंबाखू विरोधी जनजागृती केली. त्यामुळेच कु.अस्मिता शिवाजी डाखरे व श्री मनीष अशोकराव मंगरूळकर यांची निवड विभागीय ऑनलाईन बालपरिषदेसाठी करण्यात आली. आणि त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याबद्दल मूर्ती येथील या विद्यार्थी यंग लिडर्सचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
विभागीय ऑनलाईन बाल परिषदेतील आत्मविश्वास पूर्ण सक्रिय सहभागा बद्दल तसेच मूर्ती शाळेचे नाव विभागीय पातळीवर उंचावल्या बद्दल कु. अस्मिता शिवाजी डाखरे व मनीष अशोकराव मंगरूळकर यांचे अभिनंदन करून हेमंत भिंगारदेवे, संवर्ग विकास अधिकारी राजुरा, गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी राजुरा, नामदेव बावणे केंद्रप्रमुख केंद्र नलफडी, धनराज रामटेके सरपंच मूर्ती, मिथुन मंदे, अध्यक्ष राज शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, महेश शेंडे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद संजय बोबाटे, दयानंद पवार, अमोल बल्लावार आणि गावकरी यांनी आवर्जून कौतुक व अभिनंदन केले आहे.

