उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या शृंखलेत पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संवेदनशील मार्गावरून दुचाकी व पायी मार्गक्रमण करत रूट मार्च काढण्यात आले. या रूट मार्चचे नेतृत्व स्वत: पोलीस अधीक्षकांनी केले.
अकोला जिल्हात आणि शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील मुख्य मार्गांवरून रॅपिड ॲक्शन फोर्स पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूटमार्चला पोलिस मुख्यालया पासून सुरुवात झाली. यावेळी शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून मार्गक्रमण करून गुन्हेगारांना कडक संदेश देण्यात आला.

