देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका (नागपूर) प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील भिवापूर तालुक्यातील येडसंभा बोटेझरी येथे आयोजित सामाजिक समता संमेलन व दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व स्पर्धकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे पक्षाचे नाव असलेली टी शर्ट वाटण्यात आली.
या दौड स्पर्धेला सामाजिक कार्यकर्ते राजरत्न कुंभारे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. घनश्याम फुसे यांनी समता सैनिक दलाच्या पथसंचलनाचे नेतृत्व केले तर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी यशस्वी स्पर्धकांचे स्वागत केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी पोळगावच्या नागरिकांसोबत संवाद साधला असता या गावातील समस्यांचा पाढाच नागरिकांनी वाचून दाखविला. पोळगावात फक्त ४ थ्या वर्गापर्यंत शाळा आहे, ५ वी पासून च्या शिक्षणासाठी भगवानपुर ला जावे लागते, पोळगाव पासून भगवानपुर हे 3 किलोमिटर अंतर आहे. लहानग्या विद्यार्थ्यांना पायपीट करीत शाळेत जावे लागते. हि समस्या तेवढ्यावरच थांबत नसुन 5 किलोमिटर अंतरावर असलेल्या नांद या गावी दवाखाना किंवा दळणवळणाची साधनं असल्याने हे त्रासदायक अंतर पार करावे लागते.
उमरेड वरुन येणारी पोळगाव एस टी बस नांद पर्यंत गेल्यास गावकऱ्यांच्या सोयीचे होऊ शकते. अशा त्रासदायक वेदना गावकऱ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे नागपूर जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी यांच्या समोर मांडल्या, ह्या समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी पोळगावच्या नागरिकांना दिले. यावेळी गावकरी व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

