मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील रागिणी मुन यांना बेस्ट फॅशन मॉडेल अवार्ड ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील रोजेटा इलाईत क्लब मधे आयकॉनिक सुपर वुमन अवार्ड अँड किड्स अवार्ड चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ कांचन नितीन गडकरी होत्या. तर फेमस टेलिव्हिजन ॲक्टर उर्मिला शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांचे हस्ते मुन यांना बेस्ट फॅशन मॉडेल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.
सदर अवार्ड शो अंतर्गत देशभरातून 150 पेक्षा जास्त महीला स्पर्धकांनी नॉमिनेशन केले होते. त्यात 70 महिला सहभागीची निवड करण्यात आली होती. रागिणी मुन यांनी यापूर्वी सुद्धा विविध स्पर्धामधे अवार्ड प्राप्त केले आहे. हिंगणघाट शहराचे शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या रागिणी मुन यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

