पल्लवी मेश्राम उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपुरात एका चोरट्याने 2 वर्षांत चक्क 111 दुचाकी मोटर सायकल चोरून त्यांची 9 जिल्ह्यांमध्ये विक्री केली असल्याची घटना समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत या 12वी पास दुचाकी मोटर सायकल चोराचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपीचा शोध लागला. वाहन चोरीच्या प्रकरणांमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
नागपुर: येते आता पर्यंतची सर्वात मोठी वाहन चोरीची घटना उघतीस, 2 वर्षांत इतक्या दुचाकी चोरून विक्री.
ललित गजेंद्र भोगे वय 24 वर्ष विकास नगर कोंढाळी असे दुचाकी चोर आरोपीचे नाव आहे. दुचाकी चोर ललितने 21 डिसेंबर रोजी अनिल पखाले राहणार वाडी यांची दुचाकी मोटर सायकल चोरी गेली होती. पोलिसांनी या दुचाकी मोटर सायकल चोरीचा गुन्ह्याच्या तपासा दरम्यान त्या परिसरातून अनेक दुचाकी चोरी गेल्याची बाब समोर आली.
नागपुर शहरात आणि जिल्हात वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने तपास सुरू केला. ज्या भागात चोरी झाल्या तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या पोलीस पथकाने चोरी झालेले स्पॉट्स अगोदर निश्चित केले व 250 पेक्षा जास्त सीसीटीव्हीचे हजारो तासांचे फुटेज तपासले. त्यात काही ठिकाणी आरोपी ललित भोगे आढळून आला. पोलिसांकडे वाडीपर्यंतच्या सीसीटीव्हीचा ‘ॲक्सेस’ होता. त्यानंतर हा आरोपी कुठे जातो हे लक्षात येत नव्हते.
त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तपास केला असता ललित कोंढाळी परिसरात असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या ताप्यासह कोंढाळीत पाहणी केली असता तो आढळला. त्याच्याकडे संशयित दुचाकी मोटर सायकल देखील होते. त्याला विचारणा केली असता अगोदर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली केली. पोलिसांनी त्याच्या घराच्याच परिसरातून 20 चोरीची वाहने जप्त केली.
वाहन चोर ललित याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आणि पोलिसी खाक्या दाखविल्या नंतर त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली अशा अनेक जिल्ह्यांतून 111 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यावेळी वाहन चोरीचा पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता वाहनचोरीचे 85 गुन्हे उघडकीस आले. उर्वरित दुचाकीचे गुन्हे कुठे नोंदविल्या गेले आहेत याचा शोध पोलीस घेत आहे.

