निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील इरई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरई येथील पहिले ते पाचवीच्या त्या सोबत अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरई येथील विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी, भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, पॅटिस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
यावेळी विद्यार्थांनी आणि पालकांनी खाद्यपदार्थांची चव चाखली आणि शाळेच्या या उपक्रमात सहभागी होऊन त्याला यशस्वी केले.

