प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगणघाट, जि. वर्धा या वसतिगृहाच्या नविन इमारतीचे रु. १०.८६ कोटीचा लोकार्पण सोहळा सुधीर मुनगंटीवार, विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय आणि वर्धा जिल्हा पालकमंत्री यांच्या हस्ते ई लोकार्पण सोहळा झाला.
आ. समीर कुणावार या प्रसंगी मुख्य अतिथी होते. या कार्यक्रमात किशोर दिघे , केशव धाबर्डे, शंकर मुंजेवार, सतीश अंभोरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा, प्रसाद कुलकर्णी जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्धा, प्रशांत धमाणे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगणघाट आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
या वसतिगृहात विध्यार्थ्यांसाठी दोनदा मासांहार, प्रत्येक विद्यार्थी एक पलंग व संपूर्ण अंथरुण पांघरुण, शैक्षणिक साहित्य,निर्वाह भत्ता प्रति विद्यार्थी प्रति माह रु. 500/-, विद्यार्थ्यांना प्रति गणवेश रु. 1000/-, छत्री, रेणकोट व गमबुट -प्रति विद्यार्थी रु. 500/-, शैक्षणिक सहलीकरीता प्रति विद्यार्थी रु. 2000/-, 10 विद्यार्थ्यांमागे एक संगणक इंटरनेट सुविधेसह, अद्यावत, ग्रंथालय, मासिके, दररोज 5 वर्तमानपत्रे, स्पर्धा परीक्षा, खेळ, व्यक्तिमत्व विकास याकरीता तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, इ. सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

