अनिल कडू, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लिपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव अलमडोह परीसरात पोलिसांनी सापळा रचून अवैध दारू सह 2 लाख 38 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपींना अटक केली.
पोलिसांना खबऱ्या कडून मिळालेल्या माहिती वरून कळबं येथिल काही इसम हे त्यांचे मोपेड गाडीने अवैध्यरित्या देशी दारूचा माल भरून अल्लीपुर हददीतील मौजा गाडेगाव ते अलमडोह शिवारात येत असल्याचे समजले. त्या सुचणे वरून पोलिसांनी रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मोपेड गाडी क्रमांक MH-29-CC-4154 व मोपेड गाडी कमांक MH-32-AV-0910 वर दोन दोन इसम बसुन असलेली मोपेड गाडी येताना दिसली. सदर मोपेड़ गाडीला थांबवुन चेक केले असता मोपेड मध्ये अवैध दारू साठा आढळून आला. त्यावरून पोलिसांनी राजेश पाडुरंग डुकरे वय 19 वर्ष, गणेश विजय ठाकरे वय 20 वर्ष, सुरज गजानन बावणे, वय 31 वर्ष, सांगर विजय भोयर, वय २२ वर्ष, सर्व राहणार कळंब यांना अटक केली.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ठाणेदार प्रफुल डाहुले यांचे निर्देशानुसार पोलीस कर्मचारी मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, अनुप कावळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.

