अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिंचोली बस स्टॉप समोर दोन दुचाकी मोटर सायकलची समोरासमोर धडक झाली या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात मृतक नरेश मनोहर उरकुडे वय 35 वर्ष रा नंदोरी तालुका समुद्रपूर हा आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच 32 एपी 9233 ने नंदोरी येथुन पारडी नगाजी कडे जात असता चिंचोली बस स्टैंड समोर दुचाकी क्रमांक एम एच 34 बि डब्ल्यु 3329 चे चालकाने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने निष्काळजी पणे चालवुन समोरा समोर धडक दिली. यात गंभीर जखमी नरेश उरकुडे यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले पण त्यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. नामदेव कोल्हे रा नंदोरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

