मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील शेवटच्या कोटावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा तालुक्याला विभाजन करून झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
झिंगानूर गावाला कोणत्याही प्रकारची नदीपूर व नाल्यांच्या पूर येत नाही. झिंगानूर कोणत्याही प्रकारची धक्कादायक घटना घडणार नाही पाऊसाळात इतर कोणत्याही प्रकारची धक्कादायक होणार नाही, आणि 80% आदिवासी बांधवांच्या क्षेत्र आहे. हा झिंगानूर गाव चारही बाजूने मध्यस्ती असलेल्या चौरस वर आहे. कोणत्याही नद्या 15, किलोमीटर अंतरावर आहेत, इंद्रावती नदीच्या अंतर 15, किलोमीटर आहे. गोदावरी नदीचे अंतर 30, किलोमीटर वर आहेत, झिंगानूर गाव उच्च भागावरील आहेत. झिंगानूर गाव आदिवासी भागातील आदर्श म्हणून ओळखले जाते आदिवासी क्षेत्रातील माडीया व गोंड समाजातील झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यासाठी मागणी अनेक वर्ष्याचा पासून मागणी करत असून आदिवासी बांधवाकडे लक्षवेधुन झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्यात यावे 30, गावातील आदिवासी बांधवांनी मागणी केली आहे,
सन 2000, वर्षी अनेकदा निवेदन सादर करण्यात येत आहे, परंतु आजही विभाजन कायमस्वरूपी करण्यात आले नाही. झिंगानूर गाव तालुक्यातील उच्च ठिकाणी टेकडी जागेवर असल्याने कोणत्याही प्रकारची धक्कादायक होणार नाही रस्ते बंद होणार नाही अशी आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनी मागणी केली आहे,आणि शासनानी लक्ष देऊन झिगानूर गाव तालुका घोषित करण्यात यावे.

