मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी /दीक्षाभूमी देसाईगंज येथे समता सैनिक दलाचे तीन दिवसीय आंतर जिल्हा प्रशिक्षण शिबिर दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी रोजी यशस्वी रीत्या पार पाडले. शिबिराला दोनशेहून अधिक प्रशिक्षणार्थीं उपस्थिती होते. १७ फेब्रुवारी ला दुपार पासून सैनिकांचे आगमन सुरू झाले. संध्याकाळी विहारात बुद्ध वंदना घेऊन सर्वांची ओळख करून घेण्यात आली.
१८ फेब्रुवारी ला सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत श्री पुरूषोत्तम भैसारे समता सैनिक दल ट्रेनिंग चीफ व समर्थ सहारे समता सैनिक दल सह ट्रेनिंग चीफ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले. यात परेड, धावने, कदमताल, लेझीम,लाठी चालविणे, दोरी वरून वर चढने, टायर मधून सरपटत जाणे इत्यादी प्रकार होते.

१८ व १९ फेब्रुवारी ला दोन्ही दिवस सकाळी साडेपाच वाजता सैनिकांनी फेरी काढून देसाईगंज येथील सर्व बौद्ध विहारात जाऊन अभिवादन केले. १९ फेब्रुवारी ला प्रशिक्षणाचा समारोप तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नागपूर वरून आलेले पाहूणे श्री. शामराव हाडगे सर, श्री. सुनील शेंडे सर, श्री. अनिल तिरपुडे सर यांच्या उपस्थितीत पार पडला .यावेळी अनेक जिल्ह्यातील शाखा प्रमुख व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती लक्षणिय होती. प्रशिक्षणासाठी समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष श्री. अभिमन्यू बनसोड सर, प्रल्हाद लाडे SSD सचिव, वासनिक गुरूजी समता सैनिक दल सह कार्याध्यक्ष तसेच सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व सहभागी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी चंदुराव राऊत, मारोतराव जांभूळकर सर, संजय नंदेश्वर साहेब, संजय मेश्राम सर, प्रकाश बारसागडे सर, दुधराम शेंडे सर, पुरुषोत्तम बडोले सर, भूषण शहारे, आशिष घुटके व कुणाल लांडगे यांचे मोलाचे योगदान लाभले.

