अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील वेणा नदीच्या डंकीन शाहलंगडी परीसरातुन मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. सातत्याने होणाऱ्या रेती तस्करीमुळे वेणा नदीचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. या संदर्भातील तक्रारी पुराव्यासह, व्हिडीओ चित्रीकरणासह संबंधित विभागाकडे देण्यात आलेल्या आहेत. परंतू प्रशासनाने आतापर्यंत रेती तस्करांवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
या रेती तस्करांवर कायदेशीर कडक कार्यवाही करून अवैधपणे होणाऱ्या रेती उपस्यावर निर्बंध घालावा यासाठी स्थानिक हिँगणघाट मधील लोकांनी आम आदमी पक्षाचे नेते अनिल जवादे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार साहेब आणि ठाणेदार हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले.

