विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन देशातील सर्वात सर्वात जुने संघटन असून त्याची स्थापना- १९२० ला झाली. या संघटनेच्या वतीने कामगार, कर्मचारी यांच्या हक्कासाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असलेली संघटना आहे. आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा सिरोंचा तालुका मेळावा आयोजित करण्यात आला होता.
दिनांक २५ फेब्रुवारी रोजी आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा सिरोंचा तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा संघटक, आयटक यांनी मार्गदर्शन केले. कॉ. किशोर मडावी, तालुका अध्यक्ष कॉ. जुबेदा शेख आणि कॉ. किशोर चंकापुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मेळाव्यात तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मानधन वाढ, कामाची सुरक्षितता आणि कायमस्वरूपी नोकरी या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारला त्वरित या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले. कॉ. किशोर मडावी आणि कॉ. जुबेदा शेख यांनीही या कर्मचाऱ्यांना संघटित होण्याचे आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.
यावेळी कॉ. किशोर चंकापुरे यांनी या मेळाव्याचे आयोजन आणि व्यवस्थापन उत्तमरित्या केल्या बद्दल सर्वांचे आभार मानले. या मेळाव्यास तालुक्यातील मोठ्या संख्येने शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.

