Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home बीड

आष्टी-अंमळनेर ब्रॉडगेज मार्ग आणि प्रवासी रेल्वेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 28, 2024
in बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आष्टी-अंमळनेर ब्रॉडगेज मार्ग आणि प्रवासी रेल्वेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे, आता औद्योगिक विकासाला चालना देऊन युवकांना रोजगार देणार: खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला निर्धार

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड. दि.28:- बीड जिल्ह्यासाठी कामधेनू ठरणारा नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्णत्वाकडे जातो आहे, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आष्टी ते अंमळनेर या बत्तीस किलोमीटर ब्रॉडगेज मार्गाचा आणि प्रवाशी रेल्वेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने यवतमाळ येथून केला. तर अंमळनेर येथे हा कार्यक्रम खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे, हा प्रकल्प औद्योगिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्यामुळे पुढील काळात बीड जिल्ह्यात औद्योगिक विकासाची पायाभरणी करून जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा आमचा मानस असल्याचा निर्धार याप्रसंगी खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ यवतमाळ येथे पार पडला, या कार्यक्रमातंर्गत नगर- बीड- परळी रेल्वे मार्गातील आष्टी- अंमळनेर या बत्तीस किमी मार्गावर सुरु प्रवासी रेल्वेचा शुभारंभ प्रधानमंत्री मोदी यांनी व्हर्चूअली केला. तर अंमळनेर रेल्वे स्थानकावर खा. प्रितमताई मुंडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजय गोल्हार, जयदत्त धस, अजय धोंडे, रेल्वेचे निरंजनकुमार डोहारे, चंद्रभूषण, दीपक आझाद, सर्जेराव तांदळे, देविदास नागरगोजे, सलीम जहाँगीर, सविता गोल्हार, माऊली जरांगे, रामदास बडे, सत्यसेन मिसाळ, सुधीर घुमरे, भागवत येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना खा. प्रितम मुंडे म्हणाल्या कि ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्ह्याला दिलेले वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. या रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न पूर्ण होत असताना जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता होत असल्याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या. रेल्वे प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले, राज्याचा निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध झाला नाही,तरी देखील आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून केंद्राचा निधी मिळवला आणि प्रकल्पाचे काम सुरु ठेवले.

सध्या प्रकल्पाचे काम गतीने सुरु आहे, लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन परळी पासून मुंबईपर्यंत रेल्वे सुरु होईल. नगर पासून आष्टी आणि आष्टी पासून पाटोद्यापर्यंत रेल्वे आली आहे, काही महिन्यात बीड पर्यंत रेल्वे येणार असून जिल्ह्यातील प्रवासी लवकरच रेल्वेने बीडहुन मुंबईला जातील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असल्याने ज्यांनी ज्यांनी रेल्वेकरिता योगदान दिले आहे त्या सर्वांचे स्मरण आणि सन्मान होत आहे, अनेकांनी दिलेल्या योगदानातून आपल्या पुढील पिढ्यांना रेल्वेचा उपयोग होणार असल्याचे खा. प्रितमताई मुंडे यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी उपस्थितांनी अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे’च्या जोरदार घोषणा देऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्मरण केले.

Tags: आष्टी-अंमळनेर ब्रॉडगेज शुभारंभखासदार प्रितम मुंडेनरेंद्र मोदीबीड जिल्हा
Previous Post

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कन्या शाळा कुनघाडा चामोर्शी तालुक्यात प्रथम.

Next Post

वर्धा जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, लसीकरण मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, लसीकरण मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

वर्धा जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, लसीकरण मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In