रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- तालुक्यातील पुर्णा नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा करत अवैध वाळूची भरधाव वाहतूक करत असल्या बाबत वारंवार महसुल व पोलीस प्रशासनास लेखी,तोंडी व आंदोलने करूनही अवैध वाळू उपसा व वाळु वाहतुक थांबता थांबेना मात्र २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते साडे अकरा वाजे दरम्यान अचानक कानडी या गावातुन भरधाव वाळुंने भरलेला टिप्पर शेगांव पंढरपुर महामार्गावर वळताच तळणी बसस्टँड कडुन आपल्या शेताकडे चाललेला रा.तळणी तालुका मंठा येथील ज्ञानेश्वर शिवाजी सरकटे (भोला) या नावाच्या तरुणाला जवळपास वीस ते पंचवीस फुट लांब फेकुन दिल्याने तो गंभीर जखमी झाला. ताबडतोब सावरासावर करत त्या तरुणास पुढील उपचारासाठी जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शरीराने साथ न दिल्याने दि.३ मार्च रोजी रात्री अखेर त्याची प्राण ज्योत मालवली यामुळे लगेचच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली व तळणी गावावर शोककळा पसरली आणि चहुकडे हळहळ व्यक्त करत होते. त्याचा अंत्यविधी दि.४ मार्च रोजी 2.30 वाजताच्या सुमारास शोकाकुल वातावरणात तळणी येथील स्मशानभूमीत करण्यात आला.
यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडुन खुप दिवसांपासुन बिनबोभाट अवैध वाळू उपसा करण्याचा गोरख धंदा चालु असुन ते चालेना का आपल्याला काही एक देने घेने नाही मात्र वाहतुकही हळु करत नसून जसे काय त्यांच्या मागे कोणीतरी लागले असेल किंवा हे चालक नशा करूनच वाळु वाहतुक करतात की काय अशी शंका करत तर्क वितर्क लावत शेवटी एका निष्पापाचा बळी घेतलाच अशी चर्चा सुरू होती आणि आतातरी प्रशासनाला जाग येऊन यांना कोणीतरी समज देतील का ? एक तर वेळेवर नेमकी ही गाडी कुनाची म्हणुन ओळखलीही जात नाही कारण त्या गाडीवर नंबर प्लेटच नसते आर टि.ओ.कडे असेल तर देव जानो ? एखाद्या गाडीवर असले तर ते खरे की खोटे तेही खाडाखोड केलेले असते त्यामुळे हे समजु शकत नाही.
आता तरी प्रशासनाला या रात्रंदिवस चाललेल्या विना नंबरच्या अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवणे शक्य होईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे व पुन्हा एखाद्या निष्पापाचा बळी रोखण्याची देव त्यांना शक्ती देतील का असा विचार जनतेच्या मनात घुटमळतांना दिसुन येत आहे.

