Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महिला भूसंपादन अधिकाऱ्याच्या भष्ट्राचाराचे पैसे वर्धा व हिंगणघाट येथील पत संस्थेने केले वाईट?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 9, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
महिला भूसंपादन अधिकाऱ्याच्या भष्ट्राचाराचे पैसे वर्धा व हिंगणघाट येथील पत संस्थेने केले वाईट?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

25 वर्ष पूर्वी अनुदान दिलेल्या लोकांच्या नावावर दाखविले अनुदान

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्यातील काही महिला अधिकाऱ्यांनी आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत पुरुष अधिकाऱ्यांना मागे टाकले आहे. खरे सांगायचे तर सरकारी पगारातून त्यांचा उदरनिर्वाह आणि महागडे शोक पूर्ण होत नाहीत, त्यामुळे त्यांना वरच्या उत्पन्नात जास्त रस असतो. उपजिल्हाधिकारी सारख्या उच्च पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याचा असा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे संपूर्ण प्रशासनाला शरमेने मान खाली घालावी लागली आहे.

भूधारकांच्या नावे बोगस खाते उघडून त्यांच्या नावे 2 कोटी 64 लाखांचा अपहारप्रकरणी फरार असलेली तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी हिला हिंगोली येथून गुरुवार 7 रोजी अटक केली. आज शुक्रवार 8 रोजी न्यायालयात हजर केले असता गुरुवार 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तत्कालीन भूसंपादन अधिकारी तथा परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्या पासूनच त्या फरार होत्या. पोलिसांनी परभणी आणि हिंगोली येथील निवासस्थानी भेट दिल्या नंतरही त्या आढळून आल्या नाहीत. तेव्हा पासून पोलिस पथक त्यांच्या सातत्याने मागावर होते.

भष्ट्राचारी स्वाती सुर्यवंशी यांनी वर्ध्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केला होता. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नाकारला. या जामिनावर सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांच्या पथकाने त्यांना हिंगोलीतून ताब्यात घेतले. असता शुक्रवारी न्यायालयात हजर केले 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शासकीय निधीचा अपहार करण्यात आता पर्यंत पुरुष मंडळी अग्रेसर होती. पण तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी 2 कोटी 64 लाखांचा अपहार करत हम किसीं से कम नही हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

कुठल्याही शासकीय योजनेसाठी जमीन अधिग्रहण ही प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि ती जबाबदारी भूसंपादन अधिकाऱ्याकडे असते. वर्धेत 2022 ते 2024 पर्यंत या पदावर कार्यरत स्वाती सूर्यवंशी यांनी 2 कोटी 64 लाखाच्या रकमेवर डल्ला मारल्याचे चौकशीत समोर आले आहे.

स्वाती सूर्यवंशी या वर्धेच्या उपजिल्हाधिकारी, लघु सिंचन कालवे प्रकल्पच्या भुसंपादन अधिकारी म्हणून 17 फेब्रुवारी 2022 ला रुजू झाल्या होत्या. वर्धा येथे या पदावर 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत म्हणजे 2 वर्ष 26 दिवस कार्यरत होत्या. दरम्यान सूर्यवंशी यांनी या पदावर असतांना शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाली. यावरून जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम या कार्यालयातील कागदपत्र सील करत समिती स्थापन करून चौकशीला सुरवात केली. चौकशीत समुद्रपूर तालुक्यातील 25 वर्ष पूर्वी वाटप केलेल्या 16 प्रकल्पग्रस्ताच्या नावाने 2 कोटी 13 लाख 28 हजार 311 रुपये खोटे कागद पत्राच्या आधारे काढण्यात आले. तर कोषागार कार्यालयातील शासकीय खात्यातून चार लोकांच्या नावे 50 लाख 85 हजार 424 रुपये दोन पतसंस्थेत बनावटी खाते तयार करून वळत केल्याची बाब समोर आली.

सूर्यवंशी यांनी केलेल्या अपहार प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. 25 वर्षांपूर्वी निवड झालेल्या प्रकल्पच्या नावाने ज्या शेतकऱ्यांचे नाव निवड्यात नाही. मोबदला मिळण्याबाबत अर्ज सुद्धा सादर केला नाही; अश्या लोकांच्या नावाने पैसे काढण्यात आले. सोबतच या प्रकरणात वर्धेच्या शेतकरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वर्धा व आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाट यांच्यासोबत सूर्यवंशी यांनी संगणमत करून बनावटी कागदपत्रांच्या आधारे खोटे खाते तयार करून पैसे काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ माजली असून महिला उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर या पूर्वी सुद्धा काही प्रकरणात कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर महिला अधिकाऱ्याची बदली होताच या विभागात अपहार झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना मिळाली. जिल्हाधिकारी यांनी तातडीने समिती गठीत करत कागदपत्रांची तपासणी केली. यावरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. प्रकरणी वर्धा शहर पोलिसात तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार व कोणाला कोणाला अटक करणार; हे आता येत्या काळातच कळेल.

Tags: आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाटउपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी
Previous Post

पती बनला हैवान प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत. वेळ मागितला म्हणून बायकोची निर्घृण हत्या.

Next Post

मरपल्ली पोलीस स्टेशन येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राखीव पोलीस बलाच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आरोग्य मेळावा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मरपल्ली पोलीस स्टेशन येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राखीव पोलीस बलाच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आरोग्य मेळावा संपन्न.

मरपल्ली पोलीस स्टेशन येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राखीव पोलीस बलाच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आरोग्य मेळावा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In