प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, संसदरत्न सुप्रिया सुळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,महिला जिल्हाध्यक्षा ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व विदर्भ अध्यक्षा डॉ. सुरेखा देशमुख, तर प्रमुख पाहुणे समाज सेविका सिमा मेश्राम, दखवेताई यांची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेखा देशमुख यांचे स्वागत संविधान पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.
यावेळी महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान आणि कामगिरी साजरी करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने नाही, तर त्या पुरुषांच्याही पुढे गेल्या आहेत हे नाकारता येणार नाही. शिक्षण क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात महिलांनी विशेष योगदान दिले आहे.परंतु समाजात अजूनही काही लोक आहेत ज्यांना महिला केवळ घराच्या चार भिंतींच्या आतच असाव्यात असे वाटते. केवळ भारतातच नाही तर विकसनशील देशांमध्येही महिलांच्या स्थितीत अजूनही पूर्णपणे सुधारणा झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. असे मनोगत डॉ..सुरेखा देशमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्या गिरी यांनी सर्व उपस्थित महिलांना थोर पुरुषांचे पुस्तक भेट देऊन पुस्तकांचे वाचनासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे संचालन सिमा तिवारी तर आभार विद्या गिरी यांनी मानले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, जिल्हा सहसचिव सुचिता सातपुते, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, शहर सरचिटणीस सविता गिरी, ओबीसी सेल शहर अध्यक्ष आचल वकील, सुनीता तामगाडगे, सदस्या सविता मैत्रे, शुभांगी मैत्रे, प्राची खोब्रागडे, सुनीता खोब्रागडे, सविता मडावी, यशोदा शंभरकर, शितल माटे, मैथिली अबांदे, पल्लवी सुपारे, नितु मेश्राम, गीता मेश्राम, वंदना जनबंधू, सुनीता पापडकर, विना वाफळ, अमिता पुनवटकर, नंदा मोडामे, कल्पना दरबेचचार, दाणे ताई यांच्या सह राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

