Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूररात भाजपच्या शासकीय कार्यक्रमात चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू, अनेक महिला जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 10, 2024
in क्राईम, देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ, संपादकीय
0 0
0
नागपूररात भाजपच्या शासकीय कार्यक्रमात चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू, अनेक महिला जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लावी मेश्राम उपसंपादक (नागपुर)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात दहा ते बारा महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १० ते १२ हजार महिला कामगार आल्या होत्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उद्‍घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.

या चेंगराचेंगरी मनुबाई राजपूत वय ६३ वर्ष या महिलेच्या यात मृत्यू झाला आहे. मृतक महिला हातमजुरीचे काम करीत होती. याशिवाय पुनम चांडगे वय ४३, राह. रामेश्वरी, शोभा मराम वय ४५ वर्ष रा. बजरंगनगर, नंदा गोल्हर वय ५८ वर्ष, मानेवाडा, गीता रहांगडाले वय ६० वर्ष मानेवाडा अशी जखमींची नावे आहेत. मात्र, त्यापैकी पुनम चांडगे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, नंदा गोल्हर आणि गीता रहांगडाले या मेडिकलमधून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जखमींची संख्या जास्त असून त्यांची माहिती लपविण्यात येत असल्याचे समजते.

कामगार महिलांना लाभ देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने महिलांना ८ मार्च ते ११ मार्चदरम्यान ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता.८) पहाटे पाचपासून सभागृहात कामगार महिलांनी गर्दी केली होती. कामगार कल्याणकारी मंडळाचे सहायक आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह मंडळाचे सर्वच अधिकारी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला सभागृहात तीन ते साडेतीन हजार महिलांना बोलावून घेण्यात आले. मात्र, बाहेर अंदाजे दहा हजार महिलांनी रांगा लावल्याचे चित्र होते.

मंडळाद्वारे सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून महिलांना परत पाठवण्यात येत होते. किचनकिट मिळत नसल्याने महिलांनी गोंधळ घालणे सुरू केले. काही महिलांनी चक्क गेट बंद केल्यावरही त्यावरून सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी महिलांनी अशीच गर्दी केली. अंदाजे १२ हजार महिला कामगार सुरेश भट सभागृहाच्या बाहेरील परिसरात किचनकिट मिळेल या आशेने उपस्थित होत्या. याशिवाय सभागृहाच्या आतमध्येही टेबलवर किचनकिट वाटपासाठी रांगा लावल्या होत्या.

मात्र, ढिसाळ नियोजनामुळे महिलांना एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठविण्यात येत असल्याने सभागृहात गोंधळ उडाला. याशिवाय सभागृहात पाणी आणि पंख्याची व्यवस्था नसल्याने गुदमरायला लागल्याने महिलांनी बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हाच सभागृहाच्या मुख्यद्वाराजवळही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि चेंगराचेंगरीस सुरुवात झाली. त्यात मनुबाई राजपूत खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. याशिवाय दहा ते पंधरा जणांना गंभीर दुखापत झाली. त्यांना पोलिसांनी मेडिकलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना कळताच महिलांनी रोष व्यक्त केला आणि घोषणाबाजी केली.

Tags: नागपुरात चेंगराचेंगरीभाजपा नागपुर
Previous Post

हिंगणघाट राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

Next Post

वाशिम जिल्हात विद्युत ताराची चोरी, पोलिसांनी 5 आरोपीला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्हात विद्युत ताराची चोरी, पोलिसांनी 5 आरोपीला ठोकल्या बेड्या.

वाशिम जिल्हात विद्युत ताराची चोरी, पोलिसांनी 5 आरोपीला ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In