संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील मौजा करंजी येथे नक्षलग्रस्त निधीअंतर्गत मंजुर झालेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळ सभागृहाच्या संरक्षण भिंतींच्या बांधकामाचे आज चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते स्थानिक पदाधिकाऱ्यांसह भुमिपुजन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, सरपंचा सरीता पेटकर, सुहास सा. माडुरवार, राकेश पुन, सुरेखा श्रीकोंडावार, समीर निमगडे, छबिलाल नाईक, आकाश गंधारे, रामदास मोहुर्ले, पंकज चिलनकर, हरभजनसिंग डांगी, अभिजित कोंडावार आदिंसह स्थानिकांची उपस्थिती होती.

