पल्लवी मेश्राम उपसंपादक (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर दि. 15 मार्च:- रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे कारागृहातील बंदयाकरीता 02 नग e-kiosk system व सर्व बंदयांसाठी 20 नग स्मार्ट टेलिफोन चे उद्घाटन सोहळयांचे आयोजन, अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे-1 यांचे प्रमुख उपस्थित व जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महारनिरीक्षक मुख्यालय पुणे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. सदर सुविधेचा उद्घाटन सोहळयास अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे-1 व जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महारनिरीक्षक मुख्यालय पुणे यांच्या विशेष ऑनलाईन उपस्थित होते.
सुधारणा व पुनवर्सन हे कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य असून, त्या अनुषंगाने कारागृहातील बंदयासाठी शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच सज्ज असते. कारागृहातील बंदयांचे शिक्षा प्रकरण व न्यायाधीन बंदयांचे न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबत प्रत्यक्ष सर्कल परिसरात उभारलेल्या e-kiosk सुविधेच्या साहयाने माहिती मिळणार आहे.
e-kiosk system मुळे शिक्षाधीन व न्यायाधीन बंदयांना त्यांच्या कोर्टची, तारखेची, अभिवचन रजेची, संचित रजेची, उपहारगृहाची, एकंदरीतच बंदयाची संपूर्ण माहिती बायोमेट्रिक म्हणजेच बंदयाच्या एका थम्ब वर त्यांना न्यायालयीन प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. ॲलन स्मार्ट टेलिफोन सुविधेमुळे बंदयांना आठवडयातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनीटांसाठी आपल्या नातेवाईक, वकील व कुटूबांतील सदस्याशी फोनवर बोलता येणार आहे. सदर स्मार्ट फोन सुविधेमूळे महिन्यातून 12 वेळा बंदयांना आता फोन कॉल सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आठवडयातून एक वेळा विडिओ कॉल ची सुविधा दिली जाणार आहे. या फोन सुविधामुळे बंदयामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या उद्घाटन सोहळयात बंदयाना मार्गदर्शन करताना अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी स्मार्ट फोन सुविधा व VC मुलाखत सुविधेत वाढ करण्यात आल्याने बंदयाव्दारे गैरमार्गाने बाहेरील संपर्क साधण्याच्या कृतीला आळा बसला असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सदर फोन सुविधेचा कोणीही गैरवापर करु नये अशी सुचना देखील दिली.
तसेच कारागृहातील बंदयासाठी जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच तत्पर असते तसेच अजून आनंदाची गोष्ट सांगितली ती म्हणजे बंदयाच्या आहाराचा दर्जा सुधारून उच्च प्रतीचा आहार बंदयाना देण्यात यावा म्हणून राज्य शासनाकडे आहारा संदर्भात प्रस्ताव सादर केला असता राज्य शासनाची या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त होणार असल्याने कारागृहातील बंदयामध्ये अधिक उत्साहाचे वातावरण दिसून आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृह अधीक्षक वैभव आगे, उपअधीक्षक दिपा आगे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी आनंद पानसरे, श्रीधर काळे, सतीष कांबळे, तुरुंगाधिकारी यशवंत बनकर, विजय सोळंके, राजेद्र ठाकरे, दयावंत काळबांडे, कारागृह शिपाई प्रमोद चामट, मनीष शेंडे, सागर सुवासार, अनमोल हुमणे, पवन आत्राम, धर्मपाल शेंदरे यांनी परिश्रम घेतले.

