विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारताच्या पोटात घुसलेल्या गडचिरोली सारख्या ज्या भागावर नक्षली दाद धरतात, त्या भागाला रेड बेल्ट म्हणजे रक्ताच्या पट्टा असे संबोधले जाते. अशा नक्षलग्रस्त दुर्गम भागात गडचिरोलीतील जनता जीवेची पर्व न करता वास्तव्य करत आहेत, जिल्हा स्थापन झाल्यापासून 400 ते 500 स्थानिक बेकसुर लोकांची निर्घृण हत्या माओवाद्यांनी केली आहे.
अति दुर्गम व नक्षलग्रस्त या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील (3 व 4) संवर्गातील पद पोलीस भरती प्रमाणे स्थानिक उमेदवाराकडून भरण्यात यावी व याची शासन निर्णय काढण्याची कृपा करावी व लवकरात लवकर गडचिरोलीतील बेरोजगार युवकांना न्याय द्याल अशी निवेदन गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
यावेळीनिवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरामी, जिल्हा उपाध्यक्ष आकाश ढाली, कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुड़कर, प्रांतोष बिस्वास, बादल मडावी, अक्षय वाढई, निखिल बारसागडे, अभिषेक गुरणुले, आशुतोष चांगलानी आदी उपस्थित होते.

