या कार्यक्रमाचे अध्यक्षा लक्ष्मीताई मडावी यांचे प्रमुख उपस्थित कार्यक्रम पार
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिमलगट्टा उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या रेपणपल्ली उपपोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 17 मार्च रोजी उपपोलिस स्टेशन रेपनपल्ली तेथे मा.पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम रमेश यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. शशिकांत दासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात पोस्टे हद्दीतील कमलापूर गावातील ब्रँच मॅनेजर पोस्ट ऑफिस सावनी सुतार तसेच पोलिस पाटील कमलाबाई सडमेक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सहायक वंदना कुलमेथे त्याच बरोबर मौजा रेपणपल्ली गावच्या महिला सरपंच लक्ष्मी मडावी आमंत्रित अतिथी होते. तसेच सीआरपीएफ बटालियन ०९ चे पीआय गणपत सिंग व एसआरपीएफ चे पोउपनी कानोडजे मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महिला सरपंच लक्ष्मी मडावी या होत्या. या मेळाव्यामध्ये पोस्टे हद्दीतील जवळपास 250 ते 300 महिला सहभागी झाले होते या कार्यक्रमाची प्रस्थावना पोउपनी सतिश पवार यांनी केली. पोस्ट ऑफिस ब्रॅंच मॅनेजर सावनी सुतार यांनी महिलांना पोस्ट खात्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रभारी अधिकारी नारायण राठोड यांनी पोलीस खात्याअंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध शासकीय योजनांची माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले. या महिला मेळाव्यामध्ये पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून खालील योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
यावेळी विविध कागदपत्रे देण्यात आली 1) जीवन ज्योती बीमा योजना लाभार्थी – 25 2) आभा कार्ड – 86 3) आधारकार्ड अपडेट – 26 4) ऑनलाइन इनकम सर्टिफिकेट – 08 5) ऑनलाइन सातबारा – 10 6) ई- श्रम कार्ड – 12 काढून देण्यात आले.
सोबत खालील वस्तूंचे वाटप करण्यात आले.
1) गैस शेगडी – 29 2) गैस सिलिंडर – 29 3) गैस पाईप – 29 4) गैस रेग्युलेटर – 29 5) लाइटर – 29 6) साडी – 100 7) घमेले – 140 इत्यादी वस्तू वाटप करण्यात आला.
या महिला मेळाव्या मधे मौजा छल्लेवाडा गावातील प्रभाकर व्यंकटी गावडे व अरुणा निरंजन दुर्गे हे जोडपे स्व इच्छेने लग्न करण्यासाठी पोस्टे ला हजर झाले, वेळेवर विवाह साहित्य आणून त्यांना संसार उपयोगी साहित्य देवून या जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न करण्यात आला. मेळावा साहित्य वाटून झाल्यावर सर्व सहभागी महिला साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा पोलिस व एसआरपीएफ अधिकारी अमलदार यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर मेळाव्यामध्ये बहूसंख्येने महिलांनी उपस्थित होते.

