पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मोहित रवी दामले वय 8 वर्ष राहणारा चांदमारी नागपूर हा आपल्या घरातून खेळताना सुमारे सकाळ पासून अचानक हरवला होता अश्यातच सकाळ पासून मोहित हा खेळत असताना अचानक हरविल्याची खबर चांदमारी परिसरात हव्या सारखी पसरली होती सर्व कडे शोध मोहीम सुरू झाली. पण तो कुठेही मिळून आला नाही.
त्यानंतर कुटुंबाने लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये मोहित दामले हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसानी सुद्धा मोहित दामले याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. अश्यातच लकडगंज पोलीस स्टेशन दक्षता समितीचे सुनीता येरणे यांना सुद्धा मोहित हरविल्याची माहिती मिळाली व सुनीता येरणे यांनी शर्तीचे प्रयत्न केले व मोहित ला पोलिसांसोबत मिळून शोधले.
पोलिसांना पाहून खुप घाबरलेला होता व पोलिसांकडे जायला तयार नव्हता शेवटी दक्षता समितीचे सुनीता येरणे यांनी दाखवली आई ची माया सुनीता येरणे यांना बघून मोहित खुश होऊन सुनीता येरणे कडे आला व सुनीता येरणे व लकडगंज पोलीसांनी मोहितला सुखरूप घरी जाऊन परिवाराला सुपूर्द केले व मोहितच्या आई वडील व परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी पोलीसांसोबत दक्षता समितीचे सुनीता येरणे दामले परिवारचे लोक उपस्थित होते.

