पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक 16 मार्च 2024 रोजी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास जगदंब हॉटेल इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे येथे अविनाश बाळु धनवे वय 31 वर्षे याचा पूर्व वैमन्यास्याचे कारणावरून खुशाल तापकिर, विशाल तापकिर दोन्ही रा. आळंदी ता. हवेली जि.पुणे यांचे सांगण्यावरून 1) मयुर पाटोळे रा. वडमुखवाडी,आळंदी ता. हवेली जि.पुणे 2) राहुल चव्हाण 3) देवा सुतार (4) मयुर मानकर 5) शिवा बेंडेकर (6) प्रकाश उर्फ पप्पु बनकर सर्व रा. आळंदी ता. हवेली जि.पुणे यांनी एकत्र जमुन अविनाश बाळु धनवे यांचे वाढत चालेले वर्चस्व सहन न झाल्याने पिस्टलने फायर करून व कोयत्याने वार करून जीवे ठार मारले होते. ही हत्या झाल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली होती.
याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशन ला कळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.न व कलम 273/2024 भा. द. वि कलम 302, 120 (ब), 143, 147, 148, 149, 109 आर्म अक्ट 3, 25, 27 म.पो अधि कलम 37 (1),135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी हे आळंदी व दिघी पोलीस ठाणे अभिलेख वरील आरोपी असल्याने पोलीस उपायुक्त यांनी गुन्हे यांचे मार्गदर्शन खाली सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना पोशि जैनक याना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राहुल संदीप चव्हाण वय 28 वर्ष रा. चोविसा वाडी ता. हवेली जिल्हा पुणे हा चावडी चौक आळंदी येथे त्याच्या मैत्रीणीला भेटण्यास आला असल्याची खात्री झाली असता गुन्हे शाखा युनिट 3 कडील पो.हवा. सानप, पोशि जैनक, पोशि बाळसराफ, पोशि. कोळेकर असे सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी इंदापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांचे ताब्यात दिले आहे.

