प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- कोण कधी विश्वासाचा फायदा घेऊन आपली फसवणूक करेल हे सांगता येत नाही. अशीच एक फसवणुकीची खळबळजनक घटना वर्धा शहरातून समोर आली आहे. प्लॉट विकण्याच्या नावावर वर्धा शहरातील प्रफुल लाऊत्रे, वडील गणेश लाऊत्रे व त्यांचा मुलगा प्रदिप लाऊत्रे यासर्वांनी सोलापूर येथील विष्णुजी म्हैसकर यांची लाखो रुपयाने फसवणूक केली. पोलीस स्टेशन रामनगर येथे फसवनुकिचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी समीर विष्णुजी म्हैसकर वय 31 वर्ष, धंदा नौकरी रा.तामसवाडा तह. सेलु जि. वर्धा ह. मु. प्रथमेश अपार्टमेन्ट फ्लॅट नं. 9सदर बाजार सोलापुर यांनी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार दिली की, दिनांक दि.07 जुलै 2023 ला गैरअर्जदार प्रफुल लाऊत्रे वडील गणेश लाऊत्रे व त्यांचा मुलगा प्रदिप लाऊत्रे यांनी समीर म्हैसकर यांना म्हटले होते की आम्ही तुला सदर प्लॉटची विक्रीच करुन देतो असे म्हटल्याने फिर्यादीने त्यांचेवर विश्वास ठेवुन प्लॉटची इसारचिठ्ठी वगैरे केली नाही व काहीही लिहुन सुध्दा घेतले नाही व त्यांना वेळोवेळी एकुण 11 लाख 25 हजार रुपये दिले आहे.
माहे सप्टेंबर 2023 मध्ये तक्रारदार समीर त्याची आई व भाऊ निलेश असे मिळुन गणेश लाऊत्रे यांचे घरी गेले तिथे प्रदिप लाऊत्रे हा घरी भेटला त्याला प्लॉटची विक्री करुन द्या असे म्हटले तेव्हा प्रदिप लाऊने व त्याचे वडील गणेश लाउने यानी म्हटले की, सदर प्लॉटची आराजी 1.2778 अशी असुन त्यापैकी तुला 1375 स्क्वेअर फुट प्लॉट विकायचा आहे. त्याकरीता अतिरीक्त खर्च हा 50 हजार ते 1 लाख रुपये पर्यन्त लागु शकतो असे सांगीतले.
तेव्हा समीर यांनी प्रदिप लाऊत्रे याला म्हटले की, तु या गोष्टी मला प्लॉटचा सौदा करतांना सांगीतले नाही. त्यामुळे मी तुला सौद्याचे व्यतिरिक्त अतिरीक्त पैसे देत नाही. त्यामुळे गैरअर्जदार गणेश लाऊत्रे, प्रदिप लाऊने व प्रफुल लाऊत्रे यांनी समिर याला प्लॉट विक्री करुन दिला नाही. त्यामुळे समिर यांनी त्यांना दिलेले पैसे मला परत करा असे म्हटले असता त्यांनी पैसे परत करतो असे म्हणुन आजपावेतो 11 लाख 25 हजार रुपये परत केले नाही व प्लॉटची विक्री सुध्दा करून दिली नाही.
त्यामुळे प्रफुल लाऊत्रे वडील गणेश लाऊत्रे व त्यांचा मुलगा प्रदिप लाऊत्रे यांनी माझी प्लॉट विक्री संबंधाने एकुण 11 लाख 25 हजार रुपयांची विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. अशा फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार पोलीस स्टेशन सायबर येथे अप. क्र २१५ / २४ कलम 420, 34 भादवि सदर कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

