मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गुड्डीगुडम जवळील निमलगुडम येथील विहिप कार्यकर्ते तथा संदीप कोरेत मित्रपरिवार चे कट्टर समर्थक दिलीप मेश्राम यांची मुलगी कु. आकांक्षा हिचे नवस कार्यक्रमात भाजप चे आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा अहेरी विधानसभेचे युवा नेते संदीप कोरेत उपस्थित राहून बालिकेस शुभ आशीर्वाद दिले.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे युवा नेते संदीप कोरेत यांची सामाजिक भावना जगावेगळी आहे. कारण की संदीप कोरेत हे राजकारणी नसून आजही संघटनेचे कार्यकर्ते आहेत, उच, नीच, साम, दंड, भेद भाव न करता आपल्या ग्रामीण असो की शहरी भागातील बंधूंच्या सुखात व दुःखात समाविष्ट होतो आणि पाहिजे ते मदत करायला मागे जात नाही असे गरिबांचे कैवारी संदीप कोरेत.

