नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची बाल संघटिके चा उपक्रम.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 23 मार्च:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या बाल संघटिका दूर्वा सुवर्णा बादल बेले हिने आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला बारा वृक्षकुंड्या भेट देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्कर येसेकर, संचालक मधुकर जाणवे, अविनाश निवलकर, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, ऍड. मेघा धोटे, संगीता पाचघरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दूर्वा ने यापूर्वी ही आपल्या वाढत्या वयानुसार इन्फट शाळेतील ग्रंथालयाला पुस्तकं भेट दिले. यावर्षी बारा वा वाढदिवस असल्याने तिने बारा वृक्ष आणि कुंड्या आदर्श शाळेला भेट दिल्या. आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन व मानवता विकासासाठी करावा हे बाळकडू तिला लहानपणापासून असल्याने ती नियमितपणे आपला वाढदिवस उपक्रमांनी साजरा करते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यातून पहिला क्रमांक प्राप्त केलेल्या या शाळेला आपण भेट द्यावी असा तिचा मानस होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयश्री धोटे यांनी केले. तर प्रस्थाविक बादल बेले यांनी केले. यावेळी आदर्श शाळेतील शिक्षक -शिक्षिका यांनीही दूर्वा ला भेटवस्तू देऊन तिच्या उपक्रमाचे कौतुक करीत आशीर्वाद दिले.
आदर्श हायस्कुल येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण व जोगापूर जंगलातील पर्यटन केंद्रातील कक्ष क्रमांक १५५ मधील पानथळ्यावर भेट देऊन आजू बाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुराच्या शोभा उप्पलवार वनपरिक्षेत्र अधिकारी, सुनील मेश्राम वनपाल, प्रकाश मत्ते क्षेत्र सहायक वनविभाग परिक्षेत्र राजुरा संदीप तोडासे वनरक्षक सुमठाना, पवन मंदुलवार वनरक्षक राजुरा, नलीनी पिंगे मुख्याध्यापिका आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, सारिपुत्र जांभूळकर मुख्याध्यापक आदर्श हायस्कुल, बादल बेले राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, रुपेश चिडे स्काऊट मास्तर, नवनाथ बुटले, भाग्यश्री क्षीरसागर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना वर्षभरातील उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविल्या बद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. येथील पानथळ्याचे महत्व ,त्याचा उपयोग आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले व हा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. प्रस्ताविक बादल बेले यांनी तर आभार प्रदर्शन विकास बावणे यांनी केले.
शोभा उप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रम, कार्यक्रमांचे कौतुक केले तसेच वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियानातून पर्यावरणाचे संतुलन राखले जातं असल्या बद्दल समाधान व्यक्त केले. आदर्श शाळेला सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर कार्यालयाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल मिळालेल्या सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र बद्दल अभिनंदन केले.
इतरही उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी जलप्रतिज्ञा घेण्यात आली.

