Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

वंचित शिवसेना ठाकरे युती तुटली, मात्र शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा: प्रकाश आंबेडकर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 24, 2024
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
वंचित शिवसेना ठाकरे युती तुटली, मात्र शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा: प्रकाश आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंगेश जगताप, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लोकसभेच्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर झाल्या पण महा विकास आघाडीत अजूनही ताळमेळ बसत नाही आहे. मागील अनेक दिवसापासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार असे दिसत असताना एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यात शिवसेना ठाकरे पक्षा सबोत असलेली वंचित बहुजन आघाडीची युती तुटली असल्याची माहिती मिळून आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या करवीर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला. शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच काँग्रेस ४८ जागांवर लढत असेल तर सात जागांवर पाठिंबा देऊ असे ते म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच आंबेडकर यांनी केली. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती, नाही तर युती नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच ॲड. आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत त्यांनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातही आमची ताकद आहे.

काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. सर्वांचे जमले नाही तर प्रत्येकाला ४८ जागा लढवाव्या लागतील. त्यामध्ये काँग्रेस ४८ जागा लढत असेल तर ७ जागांवर पाठिंबा देऊ असेही त्यांनी नमूद केले. आम्हाला चार जागांचा प्रस्ताव कधीच दिला गेला नाही. अकोल्यासह फक्त तीन जागा देण्यात आल्याचे ते म्हणाले.

वंचित २६ मार्चला निर्णय घेणार
महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांचाच तिढा सुटत नाही. मग आमची एन्ट्री करून काय करायचं? आम्ही २६ तारखेपर्यंत थांबू, त्यानंतर निर्णय घेऊन भूमिका जाहीर करू. आम्ही एक पत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सात जागांवर एकमत झाले तर बरे होईल. आम्ही नंतर निर्णय घेऊ.

राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आंबेडकर यांची त्यांच्या राजगृह या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शेंडगे यांनी लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी होईल आणि आणि राज्यात राजकीय भूकंप राज्यात होईल असे भाकित केले. ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र ताकतीने लढतील. आम्ही २२ जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. आमच्याकडे यादीदेखील तयार आहे, असे शेंडगे म्हणाले. यावर आंबेडकर यांनी शेंडगे यांनी नवीन पक्ष सुरू केला आहे. आमचेच घोंगडे भिजत पडले आहे. ते अंतिम झाल्याशिवाय तुमच्याशी चर्चा करू शकत नाही, असे सांगितल्याचे स्पष्ट केले.

Tags: उद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकरमहाविकास आघाडीवंचित बहुजन आघाडीशिवसेना
Previous Post

आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व आदित्य अन्न तंत्र महाविद्यालय बीड येथे जागतिक जल दिवस उत्साहात साजरा.

Next Post

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In