अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदविण्या करिता आम आदमी पक्ष आणि विदर्भ विकास आघाडी यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली आहे. एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होय आणि ही घटना बीजेपी चे सरकार केंद्रामध्ये असताना झालेली आहे. मद्द धोरण गैरव्यवहार प्रकरणात केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे हे चुकीचे आहे. बीजेपी सरकार व नरेंद्रजी मोदी हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून विरोधाकावर असैवधानिक मार्गाने कार्यवाही करत आहे. यावरून असे दिसते की देशातील जनतेचे सैवेधानिक अधिकार संपुष्टात आणले जात आहे. आणि लोकशाही संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. असेच सुरू राहिले तर लोकशाही संपून हुकुमशाहीची सुरुवात होईल व देश पुन्हा गुलामगिरीत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून केजरीवाल यांना केलेल्या अटकेचा आम्ही जाहीर निषेध करतो.
यावेळी आम आदमी पक्षाचे व विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माकडे, गोकुल पाटील, जगदीश शुक्ला, विजयभाऊ राडे, भास्करराव कोटकर, किशोर तीतरे, हेमा काळे व आम आदमी पक्षाचे व विदर्भ विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

