अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 26 मार्च 2024 रोजी भारत अभियान अंतर्गत पंचायत समिती हिंगणघाट जिल्हा परिषद वर्धा च्या वतीने तालुकास्तरीय निपुणोत्सव 2023-24 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी सौ अलका सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी कोडापे, केंद्रप्रमुख आटे सर, गटसाधन व्यक्ती कविता घोडे, चौधरी, सुकळकर, यांचे उपस्थितीत निपुणोत्सव पार पडला.
त्यात माझी निपुण शाळा, आम्ही असे निपुण झालो, यावर निबंध स्पर्धा, साहित्य स्पर्धा व सादरीकरण, शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन, उत्तम कृतीचे सादरीकरण, अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक याप्रमाणे 17 स्पर्धक सहभागी झाले होते. या निबंध स्पर्धा विषयातील उपक्रमात माजी निपुण शाळा यात प्रथम क्रमांक विजेत्या सौ. रुपाली विनायक गलांडे सहाय्यक शिक्षिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यालय नांदगाव बोरगाव या मानकरी ठरल्या.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात माझी निपुण शाळेचे आव्हान स्वीकारून सदर शैक्षणिक वर्षात मिळालेले यश आहे. वैविध्यपूर्ण उपक्रमाने प्रेरित होऊन माझी शाळा निपुण शाळा चालत्या बोलत्या विद्यार्थी रुपी दैवताचे देवालय माझी शाळा मी हार्दिक नतमस्तक होते, लाख वेळा जीवणाचा खरा शिल्पकार माझी शाळा माझी निपुण शाळा, असा उत्कृष्ट निबंध लेखन करून प्रथम क्रमांक मिळविल्याने हिंगणघाट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटसाधन व्यक्ती शाळेतील शिक्षक यांच्या उपस्थितीत सौ रुपाली विनायक गलांडे यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कारमोरे, विषय शिक्षक सतीश घोडे, सौ. बेले मॅडम तथा सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व गावकरी यांनी शिक्षिकेचे अभिनंदन केले.