अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ब्रिलियन्ट स्कूल हिंगणघाट येथे उन्हाळी शिबिरामध्ये ‘जागतिक चिमणी दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ.उमेश तुळसकर सचिव विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट, तर प्रमुख उपस्थिती डॉ.नयना शिरभाते उपप्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर, नितेश रोडे प्राचार्य विद्या विकास महाविद्यालय हिंगणघाट, सविता साटोने प्राचार्य ब्रिलियन्ट स्कूल हिंगणघाट यांची होती. तर प्रमुख अतिथी म्हणून अरविंद दहापुते यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी अरविंद दहापुते यांनी जगतिक चिमणी दिवस का साजरा करण्यात येतो, त्याचे महत्व विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने समजावले, तसेच माती पासून चिमणी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले. एवढेच नव्हे तर मातीचे गणपती, मातीचे मड़के, मातीचे बैल, मातीचे भांडे, तसेच अनेक प्राणी बनविण्यात आले. विद्यार्थी मातीच्या वस्तू बनविन्याकरिता खुप उत्सुक होते. मातीच्या वस्तू बनवितांना त्यांचा उत्साह बघण्या सारखा होता.
यावेळी सर्व विद्यार्थी व ब्रिलियन्ट स्कूलच्या शिक्षिका कल्याणी झिलपे, नीता उराडे, वंदना राऊत, राणी गलांडे, ऋतुजा पतंगे, सोनल काळे, उज्वला सातपुते, प्रतिभा लाजूरकर, पायल खोडे यांचा यात सहभाग होता.

