Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

वर्धेत: शरद पवार याच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांची रॅली फसली, मग चर्चा तर होणारच; जनता आणि नेते म्हणाले…!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 4, 2024
in निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धेत: शरद पवार याच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांची रॅली फसली, मग चर्चा तर होणारच; जनता आणि नेते म्हणाले…!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा जोर वाढू लागला आहे. त्यात काल महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे अमर काळे यांनी मोठा जनसमुदाय बरोबर रॅली काढून आपला उमेदवारांच्या अर्ज दाखल केला. आज भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

वर्धा लोकसभा मतदारसंघ हा भाजपा कडे आहे. विद्यमान खासदार रामदास तडस यांना परत भाजपाने तिकीट दिले आहे. पण भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकनाथ शिंदे गटात काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ संघाचे विद्यमान आमदार आमदार आणि माजी आमदार आणि रामदास तडस याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार केलेल्या जाहिरातीवर वरून तरी हे लक्षात येते.

निवडणूक अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत असताना इव्हेंट प्रिय भाजप यात आघाडीवर राहण्याचे नेहमीचे चित्र दिसून येते मात्र वर्धेत रामदास तडस याच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना हे चित्र दिसलें नाही. फक्त हजारभर लोकं, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मिळून दिसलेली उपस्थिती संपूर्ण वर्धा जिल्हात चर्चेचा विषय ठरत आहे.

रामदास तडस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅलीत देवेंद्र फडणवीस सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वेळेवर त्यांनी सहभाग टाळला, असे ऐकायला मिळाले. त्यामुळे उमेदवार रामदास तडस हेच स्टार ठरले. तर प्रचारक म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, रामदास आंबटकर, डॉ. अनिल बोन्डे, प्रताप अडसड, सुनील गफाट, राजेश बकाने हे उपस्थित राहिले. रॅली निघाली तेव्हा आमदार कुणावार हे रस्त्यालगत उभ्या लोकांना चला, चला, करीत विनवणी करीत असल्याची बाब पण हसत हसत चर्चित झाली.

याचे प्रमुख कारण म्हणजे याच स्थळावरून काल मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांची रॅली निघाली होती. त्यात सहभागी लोकं, दिसणारा उत्साह, नारेबाजी यामुळे शहरात ही रॅली चर्चेचा विषय झाली होती. त्याचीच तुलना आज या परिसरातील नागरिक करीत होते. आज मजा नही आया, असे स्वर उमटले. हे असे का घडले, या प्रश्नावर बोलतांना भाजपचे लोकसभा क्षेत्र प्रचारप्रमुख सुमित वानखेडे म्हणाले की आमचे एवढेच नियोजन ठरले होते. शक्ती प्रदर्शन प्रकार नव्हता. पुढे आमचे मल्टीपल इव्हेंट आहेतच. आणि मुख्य म्हणजे आम्ही ही लढाई बूथ पातळीवर लढणार आहोत. गर्दी, मोठ्या सभा असे काही प्रकार नाहीत असा खुलासा त्यांनी केला. भाजपचे हे असे प्रचारतंत्र असले तरी सर्व सामान्य जनतेने मात्र रॅली फसली, असाच चर्चेचा सूर काढल्याचे पाहायला मिळाले.

Tags: अमर काळेआमदार समिर कुणावरखासदार रामदास तडसदेवेंद्र फडणवीसवर्धा जिल्हावर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकशरद पवार
Previous Post

मुंबईत: पत्नी मोबाईल वर बोलते म्हणून पतीने पत्नीवर केला चाकूने सपासप वार.

Next Post

मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा विश्व जल दिन निमित्त निबंध स्पर्धा व पारितोषिक वितरण संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा विश्व जल दिन निमित्त निबंध स्पर्धा व पारितोषिक वितरण संपन्न.

मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा विश्व जल दिन निमित्त निबंध स्पर्धा व पारितोषिक वितरण संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In