अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेत महायुतीचे राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकारावर अशोभनीय टिप्पणी केली. पत्रकारांची प्रतिमा मलिन करीत विध्वंसक विधान केले. याप्रकरणी पत्रकारांनी आज आक्रमक भूमिका घेत पोलीस निरीक्षक वृष्टी जैन यांच्याकडे कारवाईची मागणी केली.
वर्धा जिल्ह्यातील भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ काल हिंगणघाट येथे योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेत माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकारा संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा पत्रकारानी निषेध करीत सभा मंडपात सुबोध मोहिते यांच्या विरोधात निदर्शने करीत उपस्थित सर्व पत्रकारांनी योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेवर बहिष्कार टाकला. आणि उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन सुबोध मोहिते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
9 एप्रिलला पत्रकाराद्वारे प्रभारी आयपीएस पोलीस निरीक्षक वृष्टी जैन यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. पोलीस निरीक्षक वृष्टी जैन यांनी संबंधित प्रकरणावर कारवाई करण्यासाठी काही कालावधी मागितला आहे.
पत्रकार या प्रकरणी आक्रमक होत सुबोध मोहिते वर कारवाईसाठी आग्रही आहेत. यावेळी मिडीयाच्या सर्व पत्रकारांसह शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

