✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा: – जिल्हातून एक नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. शेतामध्ये पुतण्याने 45 वर्षीय काकूवर अत्याचार
केल्याची घटना दहेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी आरोपी पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पीडित महिला ही घरच्या शेतात पराटी पिकाच्या निंदणासाठी गेली होती. त्यावेळी महिलेचे लहान जावई सोबत होते. निंदण झाल्यावर जावई जेवण करण्यासाठी घरी गेले तेव्हा महिला शेतात एकटी होती. काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला आणि महिलेसोबत बळजबरी करू लागला. महिलेचे तोंड दाबून तिच्यावर जबरीने अत्याचार केला आणि आरोपी पळून गेला. पीडित महिलेच्या शेताला लागून तिच्या मोठ्या दिराचे शेत आहे. त्या शेतात तिला मोठे दीर बैल चारताना दिसले आणि तेव्हा त्यांना पीडित माहिलेने घडलेला प्रकार सांगितला.पीडित माहिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचारानंतर थेट दहेगाव पोलिस ठाणे गाठले आणि तिच्या आरोपी पुतण्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

