अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय टिळक वार्ड मध्ये लोकजनशक्ति पार्टि व महात्मा फुले समता परिषद यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार प पू डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा ज्ञानेश्वरराव खडसे तर प्रमुख अतिथी कवि मंजिदबेग मुगल (शहजाद), भाजपाचे व्यापारी आघाडी वर्धा जिल्हा महासचिव सुभाषराव निनावे, गांधी विचारवंत रमेशजी झाडे, खडगी गुरूजी, लोकजनशक्ति पार्टि (रामविलास) वर्धा जिल्हा अध्यक्ष केशव तितरे, अभा महात्मा फुले समता परिषदच्या सौ.सारिका मानकर, लताताई तितरे, सौ. प्रितीताई पाटिल यांच्या हस्ते प पू डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांचे फोटोला मालार्पन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश झाडे यांनी तर संचालन केशव तितरे यानी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खडगी गुरूजी यांनी बाबासाहेबांचे बालपनीचे अनेक प्रसंग सांगितले, कवि मजिदबेग मुगल सरांनी बाबासाहेबांच्या जिवनावर कवितांचे वाचन करून जिवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा ज्ञानेश्वरराव खडसे यांनी बाबासाहेबांच्या जिवनावर अनेक प्रसंग सांगुन समाज प्रबोधनाचे कार्य सांगीतले. आज आपल्याला स्त्री पुरूष समानता दिसते ते त्यांच्या विचारातुन व कार्यातुन दिसते असे उदगार अध्यक्षीय भाषनातुन खडसे सरानी काढले.
या कार्यक्रमाला प्रगत तितरे, अंजुबाई भोंगाडे, विभा चाफले, माधुरी संदिप तितरे, अमोल साळवे, लक्ष्मण बालपांडे, अरून लाजेवार, रंजना साळवे, शौर्य पाटिल, लक्ष्मण जामुनकर, ईदिरा मेले, सारिका गजानन मानकर, अश्विनी घ्यार, सोनी राठोड, गौरा मेले, लताताई जामुनकर, खुशी राठोड, गौरी मेले, भास्कर मोपिडवार, अमृता राऊत, मेघना मेले, राखी राठोड, सोनु गजानन मानकर, शोभाबाई कापकर, रोशनी राठोड, कविता कापकर आणि परिसरातील नागरिक लोकजनशक्ति पार्टि व महात्मा फुले समता परिषद कार्यकर्ताच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. उपस्थितांचे व पाहुण्यांचे आभार प्रगतबाबू तितरे यांनी मानले.

