उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- महामानव क्रांतीसुर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचे औचित्य साधून, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कृती समिती 2024 व बनगे परिवार पट्टण कोडोली यांच्या मार्फत समाजातील गुणवंत विद्यार्थी व किर्तीमंत व्यक्तींचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
समाजातील लहान लहान मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने बनगे परिवार यांच्या कडून इयत्ता पहिली पासून राज्यस्तरीय, तालुका स्तरीय व ऑल इंडिया स्तरावर स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध परीक्षा इ. मध्ये विशेष यश संपादन केलेल्या शालेय विदयार्थ्यांचा व समाजातील MBBS, BAMS, BHMS, पूर्ण करून शासकीय सेवेत रुजू झालेल्या डॉक्टरांचा, पदवी ग्रहण करून वकील झालेल्यांना व स्पर्धा परीक्षेत विशेष यश मिळवून शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या सामाजिक कार्यासाठी विविध संस्थांचे समाजभूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तींचा फेटा नेसवून व सन्मान चिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. नंदकुमार बनगे, दीपक बनगे, अविनाश बनगे, सर्व बनगे परिवार, उषाताई कांबळे, जयंती कृती समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, व समाजातील आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. सत्कार समारंभ पूर्ण झाल्या नंतर गौरव भीमाचा हा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी समाजातील, गावातील आबाल वृद्धांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला व सत्कार मूर्तींचे कौतुक केले.

