संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात’ अशा या सुंदर काव्या पंक्तीची प्रचिती इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्यांनी रोबोट शिक्षण प्रणालीचे केलेल्या सादरीकरणातून झाली.
इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट कान्व्हेंट येथे आयोजित या कार्यशाळेत बेसिक कार, डंपर ट्रक, सेन्सर लिफ्ट ,थ्री डी पेन, प्रेसिंग मशीन, पिक अँड प्लेस रोबोटिक टॅंक, ड्रोन ऑडिओ, लेव्हलिंग इंडिकेटर अलार्म, अँड लीड लाईट बजर, मेकॅनिकल किट, हेलिकॉप्टर्स मेकॅनिकल किड्स अँड रेस कार अशा अनेक रोबोटिक शिक्षण प्रणालीचे सादरीकरण वर्ग ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आले.
या रोबोट शिक्षण प्रणाली वर आधारित कार्यशाळेची संकल्पना संस्थेचे संचालक अभिजीत धोटे यांच्या पुढाकाराने साकार झाली. या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच या रोबोट शिक्षण प्रणालीचे सहाय्यक विनोद नगराळे, गीतांजली गेडाम, श्वेता भटारकर यासह अन्य शिक्षकांनी सहकार्य केले. या कार्यशाळेत पालकवर्गांनी या शिक्षण प्रणालीचा आस्वाद घेतला तर सुंदर उपक्रम शाळेत राबविल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.

