दोन लाख नुकसान भरपाईची मागणी.
अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १ मे:- माळेगाव ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या पाणीटंकी बांधकामाचे सेंट्रींग वादळ वाऱ्यामुळे उडून बाजूच्या घरावर कोसळल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना ३० एप्रिल मंगळवारच्या पहाटे ३ ते ३.३० वाजता सुमारास घडली. मात्र रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवित हानी टळली. संदीप भोंगाडे असे नुकसान झालेल्या घर मालकाचे नाव आहे.
पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास आलेल्या जोराचा वादळ वाऱ्यांमुळे गावातील ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या पाणीटंकी बांधकामाचे अधांतरी लावलेले सेंट्रींग उडून संदीप भोंगाडे यांच्या घरावर कोसळले. यात त्यांच्या गॅलरीच्या स्टील ग्रील, दुसऱ्या माळावरील टिनाचे शेड, झाडाच्या कुंड्या फुटल्या तसेच गाडीच्या काचा फुटून गाडीलाही नुकसान पोहचले आहे.
ग्रामपंचायत माळेगाव येथील पाणी टंकी बांधकाम २ ते ३ महिण्यापासून बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र ही घटना सकाळी घडल्याने मोठी जीवित हानी टळल्याचा आरोप करीत दोन लाखाच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
यावेळी ग्रामपंचायत माळेगाव येथील प्रशासन व ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

