हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:– पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा (पीयूपी) दिनांक १८ फरवरी २०२४ रोजी वर्ग ५ व ८ च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेत माउंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या कु. दिक्षा पी. पेटकर, नागांशु डी. रामटेके, कु. गुनाक्षी बी. दळवी, कु. आराध्या एस. कांबळे हे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
सर्व विध्यार्थ्यांच्या यशामध्ये संपूर्ण शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे माउंट इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. शैलेश झाडे सरांनी पुष्पगुच्छ व गुणपत्रिका देऊन सत्कार केला. यावेळी शाळेच्या समन्वयक सौ. अर्चना अमराज मॅडम आणि सौ. वर्षा चव्हाण मॅडम यांनी पण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

